Whats new

सानिया मिर्झाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

saniya mirza  

विम्बल्डन महिला दुहेरीतील चॅम्पियन सानिया मिर्झा हिची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली असल्याची माहिती क्रीडा मंत्रालयाने दिली. मात्र, हा पुरस्कार तिला प्रदान करण्याबाबत पुरस्कार वितरण समितीच अंतिम निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सानियाने २०१५ जुलै महिन्यात महिला दुहेरीत प्रथमच कारकिर्दीतील ग्रँडस्लॅम जिंकले होते. त्यावेळी स्वित्झर्लंडच्या हिंगीससह तिने हा पराक्रम गाजवला. ही स्पर्धा जिंकल्यानंतर दुहेरीत ती अव्वलस्थानी देखील झेपावली. आता सानियाला पुरस्कार देण्याबाबत पुरस्कार वितरण समितीच अंतिम निर्णय घेईल.सानिया मिर्झाने आजवर मिश्र दुहेरीत 3 ग्रँडस्लॅम जिंकले असून या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी स्क्वॅशपटू दीपिका पल्लिकल व गोळाफेकपटू विकास गौडा हे देखील शर्यतीत असल्याचे संकेत आहेत.