Whats new

भारतीय महिला संघाला रौप्यपदक

Indian women championship  

दोन सेटची महत्त्वपूर्ण आघाडी असतानाही भारतीय महिला तिरंदाजी संघाला रिकर्व्ह गटात रशियाकडून शूटऑफमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.दीपिकाकुमारी, लक्ष्मीरानी मांझी आणि रिमिल बुरुली या त्रिकुटाने रशियन संघावर दबाव निर्माण करीत ४-0ची आघाडी मिळविली होती, परंतु भारतीय संघाने पुढील दोन सेट गमावले आणि नंतर असा पराभव पत्करावा लागला.

भारताने या स्पर्धेत दुसरे रौप्य जिंकले आहे. यापूर्वी काल कंपाउंड प्रकारात रजत चौहानने वैयक्तिक रौप्यपदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. विश्व तिरंदाजी चॅम्पियनशीपमध्ये ही भारताची आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे.