Whats new

केंद्राकडून अजय त्यागी यांची रिझव्‍‌र्ह बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती

RBI  

केंद्रीय अर्थमंत्रालयाने आजवरच्या प्रथेच्या विपरीत रिझव्‍‌र्ह बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळाचे सदस्य म्हणून केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे राजीव मेहऋषी यांच्या जागी त्या खात्याचे अतिरिक्त सचिव अजय त्यागी यांचे नाव पुढे केले असून, त्यांची ताबडतोबीने नेमणूक करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळातील १७ सदस्यांमध्ये रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर आणि चार डेप्युटी गव्हर्नर यांच्याव्यतिरिक्त केंद्रीय अर्थमंत्रालयात कार्यरत वित्तीय सेवा सचिव यांच्यासह, आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव यांच्या नियुक्तीची प्रथा राहिली आहे. त्यातूनच आजवर राजीव मेहऋषी हे रिझव्‍‌र्ह बँकेवर प्रतिनिधित्व करीत आले होते. मेहऋषी यांच्याकडे वित्त सचिव असाही अतिरिक्त पदभार आहे.