Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

पृथ्वीपासून २१ प्रकाशवर्षे अंतरावर तीन सुपरअर्थचा शोध

SUPER EARTH  

पृथ्वीपासून फक्त २१ प्रकाशवर्षे अंतरावर खगोल शास्त्रज्ञांना एक सिक्रेट ग्रहमाला आढळली असून, त्यात एक महाकाय ग्रह व तीन सुपर अर्थ आहेत. एचडी २१९१३४ असे या ग्रहमालेच्या ताऱ्याचे नाव असून ग्रहमाला कॅसियोपिया या नक्षत्र समूहात आहे. या तीन सुपर अर्थपैकी एक ग्रह त्यांच्या सूर्यासमोरून जातो. सूर्यासमोरून जाणाऱ्या य सुपरअर्थची घनता पृथ्वीसारखीच आहे. हा ग्रह आतापर्यंत आढळलेल्या पृथ्वीसारख्या ग्रहापैकी सर्वात जवळ आहे. ही ग्रहमाला इतकी जवळ आहे की खगोल शास्त्रज्ञ आताच या नव्या ग्रहांची छायाचित्रे घेत आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर बांधण्यात आलेली व स्पेनमधील ला पामा बेटावर बसविलेल्या टेलिस्कोपियो नॅझियोनेल गॅलिलिओ या तीनही सुपरअर्थ खडकाळ असून, आपली सौरमाला तयार झाल्यानंतर राहिलेल्या अवशेषातून हे ग्रह तयार झाले असावेत असे मानण्यात येत आहे. एचडी २१९१३४ हा तारा व सुपरअर्थ यांच्यातील अंतर मोजण्यासाठी सर्व ग्रह एकमेकांसमोर व तीनही ग्रह ताऱ्यासमोर यावे लागतील म्हणजेच ग्रहण व्हावे लागेल.