Whats new

काळा पैसा लपविणा-यांमध्ये भारत चौथा

black money  

काळ पैसा परदेशात दडवून ठेवणाऱया जगभरातील देशांची यादी जाहीर झाली असून, त्यात भारत चौथ्या स्थानावर आहे.
दिल्लीतील एका वृत्तपत्राने लंडनमधील थेम्स नदीशेजारील परिसरातील नव्याने उभ्या राहणाऱया महागडय़ा फ्लॅट्सची जाहीरात दिल्यानंतर, हे सर्व काळ्या पैशांमुळे होत आहे, असे स्पष्टीकरण ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दिले. तसेच यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर काळ पैशा परदेशात पाठविणा-या जगभरातील देशांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात भारताचा चौथा क्रमांक असल्याचे स्पष्ट झाले. इनकम टॅक्सपासून वाचण्यासाठी अनेक जण आपले काळे धन परदेशात दडवून ठेवतात. यात चीन सर्वांत अग्रस्थानी आहे, तर त्यानंतर रशिया, मॅक्सिको आणि भारत आणि मलेशियाचा नंबर लागतो.