Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

साहित्य व संस्कृती मंडळावर बाबा भांड

baba bhand  

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध लेखक आणि प्रकाशक बाबा भांड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे साप्ताहिक विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांची, तर भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली.
विश्वकोश मंडळावर अरविंद जामखेडकर, मेजर जनरल शशिकांत पित्रे, अरुण फडके, सुहास बहुलकर, श्रीनंद बापट, डॉ. प्रदीप कर्णिक, दत्तात्रय पाष्टे, डॉ. अरुणचंद्र पाठक, डॉ. वसंत शिंदे, दीपक जेवणे, डॉ. गौरी माहुलीकर, प्रा. लक्ष्मणराव टोपले, भगवान इंगळे, सुरेश वाघे, डॉ. बाळा फोंडके, डॉ. ग. व्या. माने, डॉ. चंद्रशेखर सोलापूरे, डॉ. नीरज हातेकर, विवेक घळसासी, वसंत आबाजी डहाके, आशा बगे, डॉ. अक्षयकुमार काळे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
भाषा सल्लागार समितीमध्ये अनिल गोरे, डॉ. हेमचंद्र प्रधान, डॉ. अविनाश बिनिवाले, प्रा. पुष्पा गावीत, प्रा. शंकर धडके, प्रा. प्रकाश परब, अरुण करमरकर, अरुण जोशी, श्री. द. महाजन, डॉ. गिरीश दळवी, माधव जोशी, अश्विनी मयेकर, स्वाती राजे, अॅाड. दीपक गायकवाड, प्रा. संतोष क्षीरसागर, विनोद पवार, डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. सुजाता महाजन, डॉ. विनोद रामराव राठोड. याखेरीज संबंधित विभागांचे सचिवही या समितीवर सदस्य असतील तर भाषा संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील.