Whats new

महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात बनणार ‘सौर उर्जा’ प्रमुख केंद्रे

solar  

2015 मध्‍ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात सौर उर्जा क्षेत्रातील प्रमुख केंद्रे बनणार आहेत. केंद्र सरकारने देशभरात सौर उर्जा प्रकल्पांसाठी ज्या 75 भागीदारांना मंजूरी दिली आहे, त्यामध्ये या तिन्ही राष्ट्रांचे व्यावसायिक आहेत. यामध्ये महाराष्ट्र 18, कर्नाटक 16 आणि गुजरात 10 असा समावेश आहे.

केंद्राने लक्ष्य वाढविले :
मोदी सरकारने सौर उर्जा प्रकल्पावरील लक्ष्य जवडजवळ पाचपटीने वाढविले आहे. यापूर्वी सरकारने वर्ष 2022 पर्यंत 20 हजार मेगावॅट सौर उर्जा उत्पादन लक्ष्य ठेवले होते. मात्र मोदी सरकारने यामध्ये वाढ करुन 1 लाख मेगावॅट केली आहे. या लक्ष्यास पूर्ण करण्यासाठी केंद्राने लहान-मोठे व्यावसायिक आणि सर्वसाधारण व्यक्तीलाही सौर उर्जा उत्पादनासाठी प्रेरित करीत आहे. यासाठी केंद्राने एक आकर्षक योजना सुरू केली आहे. सररकारने व्यावसायिकांना आपल्या क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासाठी भागीदारी दिली आहे. ही योजना चालू झाल्यावर व्यावसायिकांनीही यामध्ये उत्सुकता दाखविली आहे. केंद्रीय अक्षय उर्जा मंत्रालयाने सांगितले की, एका महिन्यात 200 पेक्षा अधिक आवेदने आली असून यातील 75 भागीदार निवडण्यात येतील. पहिल्या टप्प्यात सर्वात अधिक भागीदारल महाराष्ट्रातून निवडण्यात येतील, त्यानंतर कर्नाटक आणि गुजरातचा क्रमांक आहे. पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारने ज्या 75 भागीदारांची निवड केली होती. ज्यामध्ये उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांचा समावेश नाही. या राज्यातून काही निवडक व्यावसायिकांनी अर्ज दाखल केले होते.