Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

एअरटेलची 4जी सेवा देशात सुरू

Airtel  

दूरसंचार कंपनी भारती एअरटेल कंपनीने भारतात ग्राहकांना 4 जी सेवेचा लाभ देण्याचे ठरवले असून देशातील 296 शहरांमध्ये 4जी सेवा सुरू होईल. यासंदर्भात एअरटलचे सीईओ गोपाल विठ्ठल अधिक माहिती देताना म्हणाले, कंपनीने सुरूवातीला सॅमसंगसोबत विशेष करार केला होता आणि आता इतर मोबाईल कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. ग्राहकांना 4जी स्मार्टफोन असलेला स्मार्टफोन, डोंगल, 4जी हॉटस्पॉट असलेला वाय फाय डोंगल्स मिळेल.

4जी सेवा 20 शहरांमध्ये सुरू असून इतर शहरांमध्ये 4जी टेस्टींग सुरू आहे. 3जी युजर्स 2 कोटी आहेत. यामधील अनेक ग्राहकांचा 4जी कडे कल आहे. एअरटेल प्रमाणेच २०१६ मध्ये वर्षी वोडाफोन, आयडिया आणि रिलायन्स कम्युनिकेशन 4जी सेवा सुरू करतील.

सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखाली घैडदोड करणारी भारतीय एअरटेल 30.3 कोटी ग्राहकांच्या साथीने जगातील तिस-या क्रमांकाची सर्वात मोठी मोबाईल कंपनी बनली आहे. भारती एअरटेल भारत, बांग्लादेश, आणि आफ्रिकेसह 20 देशांमध्ये व्यवसाय करते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारती एअरटेल ग्राहक संस्थेचा विचार करावयाचा झाल्यास जगातील तिसऱया क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी बनली आहे.वर्ल्ड सेल्युलर इन्फॉर्मेशन सर्व्हिस (डब्ल्युसीआयएस) ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, एअरटेलच्या सर्व व्यवसायातील ग्राहक संस्था 30.3 कोटीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच कंपनी जागतिक मानांकनात एक पाऊल पुढे आहे.डब्ल्युसीआयएसच्या मते, चीनची, चायना मोबाईल 62.62 कोटी ग्राहकांच्या साथीने प्रथम क्रमांकावर आहे. ब्रिटनचा व्होडाफोन गुप 40.30 कोटी ग्राहकांसह दुस-या क्रमांकावर आहे. चायना युनिकॉम 29.9 कोटी ग्राहकांच्या साथीने चौथ्या तर अमेरिकेची मोविल 27.41 कोटी ग्राहकांसह पाचव्या क्रमांकावर .