Whats new

आयफोन आता 'मेक इन महाराष्ट्र', फॉक्सकॉनचा राज्य सरकारशी करार

फॉक्सकॉन  

अॅपलच्या ज्या फोन्सची क्रेझ जगभरात आहे, त्या स्टेटस सिंबल असलेल्या आयफोनची निर्मिती आता आपल्या महाराष्ट्रात होणार आहे. ब्लॅकबेरी, अॅपल, एक्सबॉक्स, किंडल यासारख्या मातब्बर कंपन्यांसाठी इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या फॉक्सकॉन कंपनीशी राज्य सरकारने सामंजस्य करार केला आहे.
फॉक्सकॉन ही इलेक्ट्रॉनिक उत्पादन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. फॉक्सकॉन कंपनी आपलं युनिट पुण्याजवळ तळेगावात उभारणार आहे. या करारामुळे भविष्यात रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच महाराष्ट्रात आयफोनच्या किमतीही मोठ्या प्रमाणात उतरणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि फॉक्सकॉनचे अध्यक्ष टेरी गौ यांनी हा करार केला.फॉक्सकॉन ही कंपनी यापूर्वी नोकियाच्या फोनची निर्मिती करत असे. मात्र गेल्यावर्षी निर्मिती बंद केल्यानंतर ही कंपनी पुनरागमन करत आहे. 2020 पर्यंत भारतात 10 ते 12 कारखाने आणि डाटा सेंटर बनवण्याचा कंपनीचा मानस आहे.आयफोनचे सर्वाधिक हँडसेट्स चीनमध्ये तयार होतात. चीनमधील कामगारांच्या वाढत्या पगाराच्या मागणीमुळे भारत हा उत्तम पर्याय ठरु शकतो.