Whats new

टायसन फ्युरी नवा विश्व हेवीवेट विजेता

TISON

ब्रिटनचा मुष्टीयोद्धा टायसन फ्युरीने विश्व हेवीवेट गटातील अजिंक्यपद मिळवून नवा इतिहास घडविला. 2011 नंतर विश्व हेवीवेट गटातील जेतेपद मिळविणारा फ्युरी हा ब्रिटनचा पहिला मुष्टीयोद्धा आहे.

विश्व हेवीवेट गटातील लढतीत फ्युरीने युक्रेनच्या क्लिशेकोचा गुणावर पराभव केला. फ्युरीने आपल्या वैयक्तिक मुष्टीयुद्ध कारकीर्दीत आतापर्यंत विक्रमी 25 लढती जिंकल्या असून एकही लढत गमविलेली नाही. त्याने डब्ल्यूबीए, डब्ल्यूबीओ, आयबीएफ आणि आयबीओचे बेल्टस् मिळविले आहेत. गेल्या 11 वर्षांच्या कालावधीत युक्रेनच्या 39 वर्षीय क्लिशेकोचा हा पहिला पराभव आहे. ही लढत पाहण्यासाठी सुमारे 50 हजार शौकिन उपस्थित होते. या लढतीसाठी आपण गेले सहा महिने जोरदार सराव करीत होतो, असे फ्युरीने सांगितले.

Next >>