Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

अनिल कुंबळे यांनी दिला एनसीए पदाचा राजीनामा

 anil kumble

भारताचा माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने मुंबई इंडियन्सच्या मुख्य सल्लागार पदाचा राजीनामा देऊन गुड बाय केले आहे. भारतीय संघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आघाडीचे क्रिकेटपटू तयार करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आडकाठी निर्माण करत असल्याचा आरोप माजी कर्णधार अनिल कुंबळेने लावला. एनसीए पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांसोबत कुंबळे यांनी बोर्डाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

राष्ट्रीय निवड समितीच्या विकासासाठी तीन वर्षांची मोठी योजना तयार केली आहे. या योजनेमुळे भारतीय संघाला श्रीसंत, विनयकुमारसह अभिमन्यू मिथुनसारखे क्रिकेटपटू मिळाले आहेत. मात्र, या योजनेला बोर्डाने फेटाळून लावले. संघाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या या योजनेची परिपूर्ण माहिती बोर्डाला 10 वेळा दिली. मात्र, बोर्डाने याकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संघाच्या चांगल्यासाठी कार्य करताना बोर्डाकडून होत असलेल्या अडचणीमुळे मला पद सोडावे लागल्याचे कुंबळे म्हणाले. 'जंबो'च्या कारकिर्दीमध्ये मुंबईच्या संघाने २०१३ आणि २०१५ मध्ये ‘आयपीएल‘मध्ये विजेतेपद पटकावले. तर २०१३ मध्ये चॅम्पियन्स लीग स्पर्धेमध्येही मुंबईचा संघ विजयी झाला होता. 

‘सातत्यपूर्ण कामगिरी करणारा दर्जेदार खेळाडूंचा संघ बांधल्याचे समाधान आहे आणि याच समाधानासह मी हे काम थांबवत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये ‘मुंबई इंडियन्स‘ने घवघवीत यश मिळवले. दोन वेळा ‘आयपीएल‘चे अजिंक्यपद आणि एकदा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद ही कामगिरी सुखावह होती. एकाच वर्षांत दोन्ही स्पर्धा जिंकणे हा या यशाचा कळस होता.

Next >>