Whats new

आचार्य जांभेकर 2015 चा पुरस्कार जान्हवी पाटील यांना

 JANHAVI-VINOD-PATIL

पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला असून हा मसुदा पत्रकार संघटनांना पाठविण्यात येणार आहे. तसेच पत्रकारांच्या पेन्शनबाबतही आपण सकारात्मक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पत्रकारांच्या कार्याचा गौरवासाठी राज्य सरकारतर्फे दरवर्षी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावेळी जान्हवी विनोद पाटील यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राज्यस्तरीय ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. 51 हजार रुपये रोख, मानचिन्ह व प्रशस्ती पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री डॉ. मुझ्झफर हुसेन यांचा 2014 च्या ‘लोकमान्य टिळक जीवन गौरव’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. एक लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच 2014 साठीचे राज्य व विभागीय स्तरावरील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले.

Next >>