Whats new

बँकिंग फ्रंटियर्सने प्रमोद कर्नाड यांचा ‘उत्कृष्ट सीईओ’ म्हणून केला गौरव

 karnad

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कर्नाड यांना बँकिंग फ्रंटियर्सने ‘उत्कृष्ट सीईओ’ म्हणून गौरवले आहे. गोवा येथे हा पुरस्कार देण्यात आला. कर्नाड हे गेल्या साडेचार वर्षांपासून राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालकपद सांभाळत आहेत. त्यांच्या कारकिर्दीत बँकेची निव्वळ मालमत्ता १,७२० कोटी, तर नफा ४१२ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. वित्त क्षेत्रातील गाढा अनुभव असलेले कर्नाड हे साहित्यकही आहेत.

Next >>