Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

नागपुरात राहणार निसर्ग पर्यटन विकास मंडळाचे मुख्यालय

 paryatan

वनक्षेत्रावर आधारित निसर्ग पर्यटनास चालना देण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हे मंडळ राज्यातील ४८ अभयारण्ये, सहा राष्ट्रीय उद्याने आणि चार संवर्धन राखीव क्षेत्रे अशा ५८ वन्यजीव संरिक्षत क्षेत्रातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्याचे काम करेल. या मंडळासाठी नियामक आणि कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात येणार असून, त्याचे मुख्यालय नागपूर येथे राहणार आहे. नियामक मंडळाचे अध्यक्ष वनमंत्री, तर कार्यकारी समितीचे अध्यक्ष प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर हे राहतील. हे मंडळ संपूर्ण राज्यातील वन, वन्यजीव आणि वन विकास महामंडळाच्या वनक्षेत्रात निसर्ग पर्यटन, नियोजन व नियमन करेल. निसर्ग पर्यटन निसर्ग संवर्धन, निसर्ग शिक्षण, स्थानिक लोकांच्या उपजीविकेची संधी वाढवण्याचे काम हे मंडळ करेल. राज्यातील पर्यटनस्थळांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Next >>