Whats new

मुंबईतील लोकल "डिस्कव्हरी'वर!

Mumbai local

मुंबईची "लाईफलाईन‘ असलेल्या लोकल ट्रेननी आता डिस्कव्हरी वाहिनीलाही भुरळ पडली आहे. येथील सर्वात गर्दी असलेल्या रेल्वेस्थानकांतील दैनंदिन घडामोडींचा आढावा "मुंबई रेल्वे‘ या डिस्कव्हरी वाहिनीवरील मालिकेतून घेतला जाणार आहे. चार भागांची ही मालिका 7 डिसेंबरपासून दाखवण्यात येईल.

यात युनेस्कोने जागतिक दर्जाचे स्थळ म्हणून घोषित केलेले छत्रपती शिवाजी टर्मिनस, त्याची भव्यता, तांत्रिक प्रणाली आणि कामाचा ताण सहन करणारे कर्मचारी याविषयी आढावा घेतला जाईल. स्टेशन मास्तरांपासून ऑपरेशन रूममधील ड्रायव्हर, गार्ड, हमाल यांचे मनोगतही या मालिकेत जाणून घेतले जाणार आहे. मुंबईच्या लोकलची ही कथा जगभरातील प्रेक्षक पाहणार आहेत.

Next >>