Whats new

BCCI कडून सेहवागचा सन्मान, कोटला स्टेडियमच्या दोन एण्ड्सला वीरूचं नाव

sehwag

नुकतीच निवृत्ती घेतलेला टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागचा आज बीसीसीआयने सन्मान केला. दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी बीसीसीआयने त्याचा गौरव केला.

या वेळी सेहवागसोबत त्याची आई, पत्नी आरती आणि दोन्ही मुलं म्हणजे आर्यवीर आणि वेदांतही उपस्थित होते. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी मानचिन्ह देऊन या दिग्गज खेळाडूला सन्मानित केलं. सेहवागने भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानासाठी बीसीसीआयने त्याचा गौरव केला.

37 वर्षीय सेहवागने 20 ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली होती. सेहवागने त्याच्या कारकीर्दीत 104 कसोटींमध्ये 23 शतकांसह 8586 धावा केल्या होत्या. वीरुने 251 वन डे सामन्यांत 15 शतकांसह 8273 धावा केल्या होत्या. वन डेत सहवागची सर्वोत्तम खेळी होती 219 धावांची.

Next >>