Whats new

सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी टी. एस. ठाकूर यांची निवड

thakur

न्यायाधीश एच. एल. दत्तू बुधवारी निवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी टी एस ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. ठाकूर यांची नियुक्ती एक वर्षासाठी करण्यात आली असून, ते 4 जानेवारी 2017 रोजी निवृत्त होणार आहेत. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना पदाची शपथ दिली आहे. 

ठाकूर यांचा परिचय
ठाकूर यांचा जन्म 4 जानेवारी 1952 साली झाला. जम्मू आणि काश्मीरच्या उच्च न्यायालयात ठाकूर यांनी आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला होता. जम्मू-काश्मीरच्या उच्च न्यायालयात 1990 साली त्यांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून निवड झाली होती. त्यांनी कर्नाटक आणि दिल्ली येथील उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. 2008 पासून ते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. तर 2009 साली त्यांची निवड सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी झाली होती. आयपीएल गैरव्यवहार, तसेच स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या खंडपीठाचे ते नेतृत्त्व करत होते.

Next >>