Whats new

शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचे वितरण

maharashtra puraskar

राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणा-या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे पुणे येथे वितरण करण्यात आले. मराठवाड्यातील लातूरचे गणपतराव माने तसेच ज्येष्ठ क्रीडापटू रमेश विपट यांना २०१३-१४ चा राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. औरंगाबादचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. मकरंद जोशी आणि डा. उदय डोंगरेंसह सहा खेळाडू शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले. डॉ. मकरंद जोशी आणि डा. उदय डोंगरे यांनी दुस-यांदा या पुरस्काराचा बहुमान पटकावला. यापूर्वी खेळाडू म्हणून या दोघांनाही शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. आता मार्गदर्शकासाठी या दोघांना पुरस्कार मिळाला आहे. खेळाडूंमध्ये दिनेश वंजारे (तलवारबाजी), वंदिता जोशी, विवेक देशपांडे व सर्वेश भाले (जिम्नॅस्टिक) हे पुरस्काराचे मानकरी ठरले. क्रीडा व युवक संचालनालयाने २०१२-१३ व २०१३-१४ असे दोन वर्षांचे पुरस्कार वाटप केले.

Next >>