Whats new

नेट न्यूट्रॅलिटीचा फैसला करणा-यात भारतीय न्यायाधीश

net neutrality

नेट न्यूट्रॅलिटीचे नियम कायदेशीर आहेत का, याचा फैसला करणाऱ्या तीन न्यायाधीशांत श्री श्रीनिवासन हे भारतीय वंशाचे एक न्यायाधीश आहेत. अमेरिकेच्या न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. या निकालाकडे जगाचे लक्ष लागले आहे. या तीन न्यायाधीशांमध्ये प्रामुख्याने स्टिफन एफ विल्यम्स व डेव्हिड एस टेटल यांचा समावेश आहे. अमेरिकेतील उच्चपदस्थ न्यायाधीशांपैकी श्रीनिवासन हे एक न्यायाधीश आहेत. श्रीनिवासन यांची नियुक्ती २०१३ मध्ये उच्च न्यायालयात झाली आहे. तथापि, मोफत आणि खुले इंटरनेट ही ओबामा यांची निवडणूक प्रचारातील एक प्रमुख घोषणा होती; मात्र याबाबत आता श्रीनिवासन आणि अन्य दोन न्यायाधीश काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. श्रीनिवासन हे मूळचे चंदीगडचे रहिवासी असून माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निकटवर्तीयांपैकी ते एक आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केलेली आहे. अतिशय मेहनती आणि विनम्र अशी श्रीनिवासन यांची ख्याती आहे.

Next >>