Whats new

आंतरराष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धेत हर्षदा बोरकरला ब्रांझपदक

rope skipping

नवीन नाशिकमधील नवजीवन डे स्कूलची विद्यार्थिनी हर्षदा बोरकर हिने दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धेत ब्रांझपदक मिळवला. दुबईच्या निहाल स्टेडियमध्ये झालेल्या या स्पर्धेत १२ देशांच्या ४३२ खेळांडूनी भाग घेतला होता. त्यात एका मिनिटात २८२ दोर उड्या मारून नाशिकच्या हर्षदा बोरकरने नेत्रदीपक कामगगिरी केली. तिला या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे ब्रांझपदक मिळाल्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिच्या यशाने नाशिकसह देशाच्या नावलौकिकात भर पडली.

Next >>