Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

लोहखनिज उत्खननासाठी फेब्रुवारीपासून सुरू होणारी ई-लिलाव प्रक्रिया राबवणारे कर्नाटक ठरणार देशातील पहिलेच राज्य

 e-auction

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, क प्रतीचा लोहखनिज उत्खनन लीजवर देण्यासाठी ई-लिलाव प्रक्रिया राबवणारे कर्नाटक देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. कर्नाटक सरकारने यासाठी 1 फेब्रुवारी 2016 ही तारीख निश्चित केली आहे.

केंद्र सरकारने खाण आणि खनिज (विकास व नियमन) कायदा 1957 मध्ये सुधारणा केल्यानंतर लोहखनिज लीजसाठी लिलाव करण्याचा पहिला निर्णय कर्नाटकने घेतला आहे. कायद्यातील सुधारणेत नैसर्गिक स्रोतांच्या उत्खननासाठी ई-लिलाव बंधनकारक केला आहे. राज्यातील क प्रतीच्या लोहखनिज उत्खनन लीजचे पुनर्वाटप स्टील व तत्सम उद्योगांना करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने 31 महिन्यांपूर्वी राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर आता खाण व भूगर्भशास्त्र विभागाने बळ्ळारी व चित्रदुर्गमधील अशा 51 पैकी 11 खाणींसाठी ई-लिलाव प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या 11 खाणींमध्ये एकूण 127 दशलक्ष टन लोहखनिज साठा आहे.

सरकारी मालकीची कंपनी मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लि. 9 ते 11 फेब्रुवारीला ई-लिलाव प्रक्रिया राबवणार आहे. त्यासाठी आर्थिक व तांत्रिक निविदा ऑनलाइन भराव्या लागणार आहेत; पण मुख्य कंपन्यांच्या सहयोगी कंपन्यांना लिलावात भाग घेता येणार नाही. सार्वजनिक क्षेत्रातील कुद्रेमुख आयर्न ओर कंपनी लि., व जेएसडब्ल्यू स्टील या बड्या कंपन्यांनी लिलावात रस दाखवला आहे. बळ्ळारीत स्टील प्रकल्प उभारणारी आर्सेलर मित्तल कंपनीही लिलावात सहभागी होणार आहे.

Next >>