Whats new

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास १८ डिसेंबरपासून; इराण, कझाकिस्तान, टर्की, चीन, इटली, अफगाणिस्तान आदी देशांचा होणार समावेश

 kolhapur

कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांच्या वतीने आयोजित चौथ्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात दि १८ डिसेंबरपासून शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. या महोत्सवात इराण, कझाकिस्तान, टर्की, चीन, इटली, अफगाणिस्तान आदी देशांचा समावेश असणार आहे.

विविध भारती या भारतीय सिनेमा विभागात हिंदी, बंगाली, कन्नड, मल्यालम या राज्यांचा समावेश असेल. विदेशी लक्षवेधी दिग्दर्शक तसेच भारतीय लक्षवेधी दिग्दर्शक यांचे चित्रपट असतील. लक्षवेधी देश म्हणून मेक्सिकोचे चित्रपट असतील. माय मराठी विभागात नव्या चित्रपटांचा समावेश असून, त्यांना प्रेक्षक पसंती व परीक्षक पसंती पुरस्कार देण्यात येतील. यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री व पटकथाकार निवडले जातील. महोत्सवात एकूण ५० चित्रपट, ६० लघुपटांचा समावेश असेल. ज्येष्ठ दिग्दर्शकास कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कार तर चित्रतंत्रासाठी ज्येष्ठ व्यक्तीस आनंदराव पेंटर पुरस्कार देण्यात येणार आहे. चित्रपट महोत्सवाचे आकर्षण भारतीय सिनेमाच्या कारकीर्दीत सन १९५० ते १९६० हे दशक अतिशय महत्त्वाचे आहे. विशेषतः १९५५ साली निर्माण झालेल्या रौप्य व सुवर्ण महोत्सव करणारे चित्रपट अधिक असून, ज्यांना यंदा ६० वर्षे पूर्ण होत आहेत, असे काही निवडक चित्रपटही महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहेत.

Next >>