Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

14 जानेवारीपासून पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार पीफ महोत्सव

 piff

पहिल्या महायुद्धाची शंभरी आणि जर्मनीची भिंत पडण्याची पंचविशी या गेल्या वर्षीच्या थीम पाठोपाठ या वेळेसही पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने (पीफ) जागतिक शांततेचा मुद्दा अधोरेखित करण्याचे धोरण कायम ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून खेळ व सिनेमातून जग जोडू ही यंदाच्या महोत्सवाची थीम असणार आहे. येत्या 14 ते 21 जानेवारीदरम्यान पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये पीफ मधील सुमारे दोनशेहून अधिक सिनेमांचे विविध रंग अनुभवता येणार आहेत.

या वर्षी आपले 14 वे वर्ष साजरे करतानाच पीफ मध्ये काही नवे उपक्रमदेखील राबवले जाणार आहेत. यंदा विविध शैक्षणिक संस्थांचे सहकार्यही महोत्सवास मिळणार आहे. यंदाच्या महोत्सवातील प्राथमिक निवडीसाठी सुमारे 104 देशांतील विक्रमी 986 चित्रपटांनी आपला सहभाग नोंदवल्याची माहिती या वेळी देण्यात आली. शिवाय, यंदा पुण्याच्याच धर्तीवर सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

पीफ मध्ये हे असणार-
आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभाग, मराठी स्पर्धा विभाग, विद्यार्थी स्पर्धा विभाग हे नेहमीचे विभाग शिवाय खेळ व चित्रपट... मनुष्याचे अंतरंग व चित्रपट... साहित्य आणि चित्रपट, अॅनिमेशन असे विशेष विभाग यंदा फक्त आशियायी चित्रपटांना स्थान देणारा एक खास विभागही आकर्षण ठरणार राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने जतन केलेल्या काही निवडक फिल्म्स दाखवल्या जातील सोबतच मुलाखती, कार्यशाळा, व्याख्याने आदी.

Next >>