Whats new

डॉ. आंबेडकरांच्या स्मृत्यर्थ नाण्यांचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

 ambedkar

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांच्या स्मृत्यर्थ दोन नाण्यांचं अनावरण केलं. दहा आणि 125 रुपये मूल्याच्या दोन नाण्यांचं आंबेडकरांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त अनावरण करण्यात आलं.

‘महापरिनिर्वाणाच्या 60 वर्षांनंतरही स्मरण केल्या जाणा-या मोजक्या व्यक्तींपैकी डॉ. आंबेडकर हे एक होते. आजच्या काळात भारतापुढील समस्यांचा विचार करताना जितकं बाबासाहेबांच्या विचारांचं स्मरण करावं, तितकी त्यांची दूरदृष्टी दिसून येते, डॉ. आंबेडकरांबाबत तितकाच अधिकाधिक सन्मान वाटतो,’ असे उद्गार यावेळी मोदींनी केले. बाबासाहेबांची स्वाक्षरी लंडनमध्ये झळकणार :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ११५ वर्षांपूर्वी प्राथमिक शाळेत प्रवेश घेताना मोडी लिपीत केलेली स्वाक्षरी लंडनमध्ये होणा-या त्यांच्या स्मारकात लवकरच झळकणार आहे. दि. ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा हायस्कूल (सध्याचे छ. प्रतापसिंह हायस्कूल)येथे प्रवेश घेतेवेळी मोडी लिपीत केलेली स्वाक्षरी १ हजार ११४व्या क्रमांकावर शाळेच्या रजिस्टरला आजही पाहायला मिळते. ही नोंद आज अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. याचे कारण, या स्वाक्षरीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ शाळाप्रवेशच झाला नाही, तर ती एक युगांतराची सुरुवात होती. ज्या स्वाक्षरीने डॉ. आंबेडकरांचा ज्ञानाच्या अवकाशामध्ये प्रवेश झाला होता, ती स्वाक्षरी आता केवळ साताऱ्यापुरती मर्यादित राहिली नसून, सातासमुद्रापार लंडनला निघाली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये शिकत असताना ज्या बंगल्यात वास्तव्यास होते, ते निवासस्थान अलीकडेच महाराष्ट्र सरकारने ताब्यात घेतले आहे. या निवासस्थानात संग्रहालय होणार असून, त्यामध्ये डॉ. आंबेडकरांची पहिली स्वाक्षरी झळकणार आहे. Next >>