Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

भारतास हॉकीत ऐतिहासिक विजय, 33 वर्षांनंतर जिंकला ब्रांझ

 hockey

भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला, भारताने मॉस्को ऑलिंपिकनंतर जागतिक हॉकीतील पहिले पदक जिंकण्यात यश मिळवले. भारताने जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेल्या नेदरलॅंडस्ला हरवून वर्ल्ड हॉकी लीगमध्ये ब्रांझपदक जिंकण्याचा पराक्रम केला. रायपूरच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवरील या लढतीत भारत मध्यांतरास, अर्थात दुस-या सत्रानंतर 0-2 पिछाडीवर होता; पण त्यानंतर भारताने जबरदस्त प्रतिकार करीत 3-2, 5-3 आघाडी घेतली. त्यानंतर सातत्याने गोलसाठी चुरस झाली. भारत निर्धारित वेळेतच जिंकणार, असे वाटत होते. केवळ पाच सेकंद बाकी असताना नेदरलॅंडस्ने 5-5 बरोबरी साधली. मग गोलरक्षक पीआर श्रीजेशने अप्रतिम कामगिरी करताना भारतास पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 असे विजयी केले.

सुरुवातीस भारताला पेनल्टी कॉर्नर मिळत नव्हते, मिळाले तर दवडले जात होते आणि भारत 0-2 असा मागे होता. तिस-या सत्रापासून भारतीयांनी कात टाकली. रुपिंदर पाल सिंग, तसेच रमणदीप सिंगने दोन आणि आकाशदीप सिंगने एक गोल करीत 56 व्या मिनिटास भारतास 5-3 आघाडीवर नेले. दोन मिनिटे असेपर्यंत हेच चित्र होते. व्हॅन डेर वीर्दन मिंक याने दोन सनसनाटी गोल करीत नेदरलॅंडस्ला बरोबरी साधून दिली.

पेनल्टी शूटआउटमध्ये मुजतबाने संधी दवडली आणि मैदानात शांतता पसरली, पण श्रीजेश भारताच्या मदतीस धावून आला. त्याच्या चमकदार कामगिरीमुळे भारतास 2-2 अशी बरोबरी राखता आली होती. अखेरच्या प्रयत्नात मनप्रीतने गोल करण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. मात्र तो अवैधरीत्या रोखला गेल्यामुळे भारतास पेनल्टी स्ट्रोक देण्यात आला. हा स्ट्रोक सत्कारणी लावत रुपींदरने भारतास विजयी केले.

Next >>