Whats new

‘बालरंगभूमीचे शिल्पकार’ संजय पेंडसे

 sanjay pendse

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईद्वारे सोलापूर येथे आयोजित मराठी बालनाट्य संमेलनात नागपूरच्या बालरंगभूमीचे प्रणेते संजय पेंडसे यांचा बालरंगभूमीचे शिल्पकार ही उपाधी देऊन गौरव करण्यात आला. बालरंगभूमीशी निगडित अशा दहा व्यक्तींना या वेळी गौरवण्यात आले. नागपूर येथील रंजन कला मंदिर संस्थेचे कार्यवाह आणि बालविभाग बालरंजनचे सूत्रधार असलेले संजय पेंडसे मागील ४४ वर्षांपासून बालरंगभूमीवर कार्यरत आहेत. वयाच्या १६ व्या वर्षी ‘अडकीत जाऊ खिडकीत जाऊ’ या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला होता. आजपर्यंत त्यांनी ९३ बालनाट्यांची निर्मिती तसेच दिग्दर्शन केले आहे. त्यांनी आजपर्यंत एक हजारपेक्षा जास्त बालकलावंतांना घडवले आहे.

Next >>