Whats new

महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार वैद्य नारायण विद्वांस यांना जाहीर

  khadiwale

वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे देण्यात येणारा यंदाचा महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार वैद्य नारायण विद्वांस यांना जाहीर झाला आहे. 31 हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेतर्फे देण्यात येणा-या अन्य पुरस्कारांसाठी वैद्य ज्योती मुंडर्गी, शिशिर पांडे, देवदत्त देशमुख, शैलेश माळी, घनश्याम कोडवानी, अरुण लखपती, सरोज पाटील, मोहन जोशी, सुश्मिता घोपेखरकर, रवींद्र गुंडलवार, अशोक साधले, आर. बी. गिरी आदींची निवड झाली आहे. प्रत्येकी 11 हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. येत्या 31 डिसेंबर रोजी पुण्यात पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे, अशी माहिती वैद्य द. उ. घेगडे यांनी दिली.

Next >>