Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

मुंबई विद्यापीठाचे 'डिजीटल लॉकर'

  mumbai vidyapeeth

मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना डिजीटल लॉकर्सची सोय उपलब्ध करून दिली आहे. ‘मायइजीडॉक्‍स’च्या साहाय्याने ग्लोबल डॉक्‍युमेंट ऑथेंटिकेशन नेटवर्क या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांना आता पदवी आणि गुणपत्रिका पडताळणीची सेवा ऑनलाइन मिळणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून ही सुविधा चालू वर्षातील व मुंबई विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. भारतातील पारंपरिक विद्यापीठांपैकी असा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारे मुंबई विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. यंदा 2015 चे पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यानंतर जाहीर होणा-या निकालाच्या गुणपत्रिका या योजनेद्वारे उपलब्ध होणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून पूर्णतः ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.

सध्या भारतात शैक्षणिक संस्थांमार्फत विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्र हे कागदावर उपलब्ध करुन दिली जातात. ती शैक्षणिक कागदपत्रे नंतर संबंधित शैक्षणिक संस्थेमार्फत मूळ कागदपत्रांशी पडताळणी करून त्यांची खातरजमा केली जाते. यामध्ये अनेकवेळा वेळेचे अपव्यय होताना दिसून येते. याबरोबर अनेकदा गैरप्रकार होण्याचा धोकाही संभावतो, मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आजमितीला भारतात महत्त्वाची कागदपत्रे अधिक सुरक्षितरित्या उपलब्ध करुन देण्यासाठी हालचालींना वेग आला असून, त्याच धर्तीवर मुंबई विद्यापीठाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, विद्यापीठात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने विविध सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तयार करुन उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. यामध्ये उच्चप्रतीच्या सुरक्षिततेचे सर्व निकष पाळले जाणार आहेत.

अशी होणार कार्यान्वित प्रक्रिया
· निकाल जाहीर झाल्यावर मुंबई विद्यापीठाच्या रिपोझटरीमध्ये माहिती अपलोड केली जाणार
· हा सर्व डेटा बीट इनस्क्रिप्टेड डिजीटल स्वाक्षरीयुक्त असणार
· उपलब्ध माहितीवरून गुणपत्रिका तयार केल्या जाणार असून, खातरजमा केल्यावर छपाई करता येणार
· गुणपत्रिका डाऊनलोड करण्यासाठीच्या सर्व सूचना आणि त्याची एक लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जाणार
· सुरक्षेचे सर्व निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी होणार असून, पडताळणी करता येणार
· गुणपत्रिकांची पडताळणी करणाऱ्या कोणत्याही संस्थेला विद्यार्थ्यांनी विशिष्ट शुल्क भरल्यानंतर पडताळणी करता येणार आहे
· विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पडताळणी संस्थेच्या वतीने इमेल पाठवला जाईल.

Next >>