Whats new

संजय आवटे यांना पत्रकार संघाचा रमेश गोगटे स्मृती पुरस्कार

 awte

संजय आवटे यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट राजकीय बातम्यांसाठी दिला जाणारा रमेश गोगटे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर वर्षी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारितेत वैशिष्ट्यपूर्ण काम करून स्वतंत्र ओळख निर्माण करणा-या पत्रकारांना पुरस्कार दिले जातात. ललित लेखनाबद्दल दिला जाणारा विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार ह. मो. मराठे यांना जाहीर करण्यात आला आहे. जयहिंद प्रकाशन पुरस्कार गिरीश कुबेर यांना ‘टाटायन’ या पुस्तकासाठी जाहीर करण्यात आला आहे. बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवर वर्षभरात उत्कृष्ट वृत्तान्त व स्तंभलेखनासाठी दिला जाणारा आप्पा पेंडसे पुरस्कार राजेश सावंत यांना घोषित झाला आहे. कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील लिखाणाबद्दल दिला जाणारा कॉ. तु. कृ. सरमळकर स्मृती पुरस्कार विनोद साळवी यांना दिला जाणार आहे.

Next >>