Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

आरोग्य विद्यापीठ, नैरोबी विद्यापीठ व मर्क सेरोनो सुरू करणार इंटरनॅशनल फेलोशिप प्रोग्राम इन मेडिकल ऑकोलॉजी अभ्यासक्रम

  nairobi

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, कॉलेज ऑफ हेल्थ सायन्सेस (नैरोबी विद्यापीठ) आणि मर्क सेरोनो (मिडल ईस्ट, दुबई) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. आरोग्य विद्यापीठ, मर्क आफ्रिका इंटरनॅशनल फेलोशिप प्रोग्राम इन मेडिकल ऑकोलॉजी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दुबई येथील मर्क सेरोनो मल्टिनॅशनल कंपनीच्या चीफ सोशल ऑफिसर राशा केलेज यांनी दिली.

विद्यापीठात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ-मर्क आफ्रिका इंटरनॅशनल फेलोशिप प्रोग्राम इन मेडिकल ऑकोलॉजीचे उद्घाटनावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, प्रतिकुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर, कुलसचिव डॉ. काशीनाथ गर्कळ, दुबई येथील राशा केलेज, स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस, युनिव्हर्सिटी ऑफ नैरोबीचे प्राचार्य प्रा. झॅक किब्वेज, प्रा. निकोलस अभिन्या, बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड मार्केट डेव्हलपमेंटचे (आफ्रिका) संचालक लिओनार्द सायका, वैद्यकीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, मुंबईतील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट, टोपीवाला नॅशनल वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भरमाल उपस्थित होते. या वेळी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. गर्कळ, श्रीमती केलेज, प्रा. किब्वेज यांनी स्वाक्ष-या केल्या.

आफ्रिकेतील देशांमध्ये कर्करोग रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तेथे या विषयावरील तज्ज्ञ उपलब्ध व्हावेत, यासाठी आरोग्य विद्यापीठाच्या पुढाकाराने ‘फेलोशिप कोर्स इन मेडिकल ऑकोलॉजी’ हा अभ्यासक्रम सुरू केला जात आहे. कर्करोगाच्या रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे आता शक्य होणार आहे. या संपूर्ण अभ्यासक्रमात टेलि मॉनिटरिंग या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केला जाणार आहे. जगात इतर देशांच्या तुलनेने कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण आफ्रिकेत अधिक आहे. त्यामुळे या वैद्यकीय ऑकोलॉजी आंतरराष्ट्रीय फेलोशिप प्रोग्राममुळे कर्करोगावर संशोधन होण्यास मदत होईल. आरोग्य विद्यापीठाच्या संबंधित महाविद्यालये व संस्थांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ नैरोबीच्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या अंमलबजावणीची रूपरेषा, परीक्षापद्धती आदी बाबी आरोग्य विद्यापीठातर्फे केल्या जातील. हा अभ्यासक्रम सहा महिन्यांच्या एकूण चार सत्रांत होणार आहे.

Next >>