Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

ऍक्युपंक्चर चिकित्सा पद्धती विधेयकाला मंजुरी

 accupuncture

अक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला विधिमंडळात एकमताने मान्यता मिळाली. अक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीचे विधेयक वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत मांडले. हे विधेयक सभागृहात दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर करण्यात आले.

ऍक्युपंक्चर चिकित्सा पद्धती ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय चिकित्सा पद्धत आहे. या चिकित्सा पद्धतीला तिच्या विकासासाठी योग्य ती संधी निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच या चिकित्सा पद्धतीचे अध्यापन व व्यवसाय यांचे विनियमन करणे आवश्यक आहे. याचदृष्टीने महाराष्ट्रात ही पद्धती लागू करण्यात आल्याची प्रक्रिया सुरू करत आहोत, असे विनोद तावडे यांनी सांगितले. अक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीच्या विधेयकाची माहिती देताना तावडे यांनी सांगितले, की आशियामधील शेजारील राष्ट्रांना अक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीची ओळख सहाव्या शतकात झाली व तेथे ही पद्धत तत्परतेने स्वीकारली गेली. 16 व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत ही पद्धत युरोपपर्यंत पोचली. गेल्या दोन दशकांत ऍक्युपंक्चर चिकित्सा पद्धती ही जगात पसरली असून, त्यामुळे या चिकित्सा पद्धतीच्या विकासाला चालना मिळाली, असेही तावडे यांनी नमूद केले.

Next >>