Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना यंदाचा ‘पुलोत्सव सन्मान’

 babasaheb purandare

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना यावर्षीचा ‘पुलोत्सव सन्मान’, तर प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री यांना ‘पुलोत्सव तरुणाई पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तर अवघ्या महाराष्ट्रात ‘पुलोत्सव’मध्ये ज्या पुरस्काराचा वारसा रत्नागिरीतून सुरू झाला, तो ‘पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देवरूख येथील ‘राजू काकडे हेल्थ ऍपॅडमी’ला जाहीर झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात रंगणा-या ‘पुलोत्सव’मध्ये हे पुरस्कार सत्कारमूर्तींना प्रदान करण्यात येणार आहेत. मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘पुलोत्सव’मध्ये ‘पुलोत्सव तरुणाई पुरस्कार’ने चतुरस्र अभिनेता पुष्कर श्रोती यांना गौरवण्यात येणार आहे. चतुरस्र अभिनयाने महाराष्ट्राच्या चित्रपट क्षेत्रात पुष्कर यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विनोदी शैलीच्या या अभिनेत्यामध्ये गांभीर्याची छटाही तितकीच ठासून भरली आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ आणि शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘काकडे ऍपॅडमी’ला ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’
देवरूख येथील ‘राजू काकडे हेल्थ ऍपॅडमी’ला यावर्षीचा ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ‘पु.लं’ व सुनिताबाईंच्या दातृत्त्वाला सलाम करणारा हा पुरस्कार आहे. ‘आर्ट सर्कल’ने आशय सांस्कृतिक-पुणेला ‘पुलोत्सव’मध्ये असा पुरस्कार सुरू करण्याचे सुचविले होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ आणि 11 हजार रूपये रोख, तसेच ‘माऊली प्रतिष्ठान’तर्फे 10 रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार सामाजिक बांधिलकी जबाबदारीने पुढे नेणा-या संस्थेला देण्यात येतो. त्यानुसार ‘राजू काकडे हेल्थ ऍपॅडमी’ची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ही संस्था गेली 7 वर्षे कार्यरत आहे. संकटात असणा-यांना ही संस्था त्वरित आधार उभी करून देते. या संस्थेकडे 30 प्रशिक्षित कार्यकर्ते असून 100 जणांची टीम आहे. विशेष म्हणजे स्वतंत्र महिला विभागही आहे.

Next >>