Whats new

भीमराव पांचाळे यांना एकता कलागौरव पुरस्कार

 bhimrao

गझल क्षेत्रात अतुलनीय कामगिरीबद्दल एकता कल्चरल अकादमीच्या वतीने प्रख्यात गझल नवाझ भीमराव पांचाळे यांना या वर्षीचा एकता कलागौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. नाट्य़ दिग्दर्शकसाठी मंगेश कदम यांना सुहास भालेराव स्मृती पुरस्कर, पत्रकारितेसाठी राजा आदाटे यांना श्रीकांत पाटील स्मृती पुरस्कार, तसेच पत्रकारितेसाठी रवींद्र माने यांना नारायण पेडणेकर स्मृती पुरस्कार, साहित्यासाठी सायमन मार्टिन यांना नारायण सुर्वे स्मृती पुरस्कार, रमेश यादव यांना दया पवार स्मृती पुरस्कार, नृत्यासाठी महेश दवंडे यांना सुबल सरकार स्मृती पुरस्कार, कलेसाठी सुधाकर उलवे यांना विठ्ठल उमप स्मृती पुरस्कार, वृत्तपत्रलेखनासाठी मास्तर दत्ताजी स्मृती पुरस्कार शिवाजी गावडे यांना, वैद्यकीय क्षेत्रासाठी सुयोग दांडेकर यांना जयप्रकाश नारायण स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. समाजसेवेसाठी बिरसा मुंडा स्मृती पुरस्कार कीर्ती ढोले यांना, संत गाडगेबाबा स्मृती पुरस्कार नाना केदारे यांना, संगीता खर्डीकर यांना अहिल्याबाई होळकर स्मृती पुरस्कार, बाळाराम साळवी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, प्रकाश पाटील यांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, दिलीप मालवणकर यांना महर्षी धोंडू केशव स्मृती पुरस्कार, चंद्रकांत घाटगे यांना मातोश्री रमाबाई आंबेडकर स्मृती पुरस्कार, संजय गुंजाळ यांना प्रबोधकार ठाकरे स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. हे पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते गिरगांव येथील साहित्य संघात प्रदान कण्यात येतील.

Next >>