Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

फिफा इंडियाच्या निवड समिती सदस्यपदी आलोक शर्मा

 fifa

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या (फिफा) वर्ल्डकप संघ निवड समिती सदस्यपदी देहूरोडच्या आलोक शर्मा यांची निवड झाली आहे.

15 वर्षांखालील मुलांच्या राष्ट्रीय संघात महाराष्ट्रातील फुटबॉलपटू निवडण्याची जबाबदारी शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. राष्ट्रीय संघात निवड झालेल्या खेळाडूंना 2017 मध्ये होणाऱया 17 वर्षांखालील फिफा वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. एआयएफएफ निवड समिती सदस्यपदासाठी देशभरातून एकूण दहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शर्मा यांनी 1990 मध्ये आपल्या फुटबॉल कारर्किदीला सुरूवात केली. 1996 मध्ये ते कोलाबा यंगस्टर्स व्यावसायिक क्लबमध्ये सहभागी झाले. त्यानंतर 1998 ला गल्फ क्लब 2001 मध्ये संगम एफसी 2003 मध्ये केपी इलेव्हनमधून ते खेळले. इंद्रायणी एफसी संघातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. 1999 मध्ये शर्मा महाराष्ट्राच्या 21 वर्षाखालील फुटबॉल संघात सहभाग घेतला. महाराष्ट्राकडून 2001 मध्ये संतोष ट्रॉफीतदेखील त्यांनी भाग घेतला. त्यांना विविध स्पर्धांतून 89 वेळा सामन्याचे मानकरी हा किताब मिळाला आहे.

पुणे विद्यापीठासाठीदेखील शर्मा यांनी 10 वर्षे फुटबॉल प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. याशिवाय इंद्रायणी एफसीचे ते प्रमुख प्रशिक्षक आहेत. सध्या ते महाराष्ट्राच्या फुटबॉल वर्ल्डकपच्या 17 वर्षांखालील निवड समितीचे सदस्य आहेत.

Next >>