Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

भुवनेश्वरच्या ‘केआयएसएस’च्या विद्यार्थ्यांचे दोन विश्व विक्रम

 kiss

भुवनेश्वरच्या कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायंसेजने (केआयएसएस) दोन ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ बनवण्यात यश मिळवले आहे. केआयएसएसच्या १५,२२५ विद्यार्थ्यांनी ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस’च्या अधिकाऱ्यांसमोर ‘WE URGE FOR WORLD PEACE’ मानवी वाक्य तयार केले. या सोबतच त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस’च्या पूर्वसंध्येला जगाला शांती आणि दहशतवादाच्या विरोधात लढाईसाठी सोबत येण्याचा संदेश दिला.

या सोबतच केआयआयएच्या विद्यार्थ्यांनी ‘Most Simultaneous Hi-Five in a Human Chain’ बनवून दुसरा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम बनवण्यासाठी २५,१५१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस'च्या अधिकारी फॉर्चुना लिसा बर्क या दोन्ही जागतिक विक्रमाच्या साक्षीदार बनल्या.

सर्वात मोठे मानवी वाक्य' बनवण्याचा विक्रम २५ नोव्हेंबर २०१५ ला दुबईमध्ये ६,९५८ लोकांनी मिळून केला होता, तर "Most Simultaneous Hi-Five in a Human Chain'चा मागील विक्रम कॅनडामध्ये ७,२३८ लोकांनी मिळून केला होता. केआयएसएसच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी हे दोन्ही जागतिक विक्रम मोडीत काढत स्वत:च्या नावावर केले आहे.

Next >>