Whats new

फेडररच्या प्रशिक्षकपदी लुबिसिक रुजू

 roger fedarar

स्वित्झर्लंडचा तृतीय मानांकित टेनिसपटू रॉजर फेडरर याने क्रोएशियाचा माजी टेनिसपटू इव्हान लुबिसिक याच्याशी नवा प्रशिक्षक म्हणून करार केला आहे. स्वीडनचा माजी टेनिसपटू आणि सहावेळा ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपद मिळवणारा स्टीफन एडबर्ग हा 2014 पासून फेडररला साहाय्यक प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करीत होता.

फेडररने एडबर्गबरोबरचा हा करार संपुष्टात आणल्याचे आपल्या वेबसाइटवरून जाहीर केले आहे. एडबर्गच्या साहाय्यक प्रशिक्षकपदाच्या दोन वर्षांच्या कालावधीत आपल्याला टेनिस क्षेत्रामध्ये चांगलेच यश मिळाल्याचे फेडररने म्हटले आहे. फेडररने आपले प्रमुख प्रशिक्षक लुथी हे यापुढेही पद सांभाळतील, असे सांगितले. 2016 च्या एटीपी टूर टेनिस हंगामाला फेडरर 3 जानेवारीपासून सुरू होणा-या ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेने सुरुवात करणार आहे

Next >>