Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to www.allauddin.co.in

Allauddin

‘फोर्ब्ज’च्या यादीत शाहरुख खान अव्वल!

 shahrookh

‘फोर्ब्ज’ने तयार केलेल्या देशातील यंदाच्या ‘टॉप 100 सेलिब्रेटीं’च्या यादीमध्ये ‘बॉलिवूडचा बादशाह’ शाहरुख खानने अव्वल स्थान पटकावले आहे. अभिनेता सलमान खान दुस-या, तर ‘बिग बी‘ अमिताभ बच्चन तिस-या स्थानी आहेत. एखाद्या सेलिब्रेटीची ‘ब्रॅंड व्हॅल्यू’ आणि त्याचे वर्षभरातील उत्पन्न असे या यादीचे निकष आहेत. बहुतांश सेलिब्रेटींच्या मानांकनामध्ये त्यांच्या उत्पन्नाचा मोठा वाटा असला, तरीही काही जणांच्या मानांकनामध्ये उत्पन्नापेक्षा लोकप्रियता हा अधिक महत्त्वाचा निकष मानण्यात आला आहे.

उदाहरणार्थ, क्रिकेटपटू रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग, हरभजनसिंग, ईशांत शर्मा, गौतम गंभीर, गायक यो यो हनीसिंग, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, सनी लिऑन इत्यादींच्या मानांकनामध्ये लोकप्रियता हा अधिक महत्त्वाचा निकष आहे.

त्याआधारे ‘फोर्ब्ज‘च्या यादीतील पहिले दहा सेलिब्रेटी पुढीलप्रमाणे :
1) शाहरुख खान : (257.50)
2) सलमान खान : (202.75)
3) अमिताभ बच्चन : (112)
4) महेंद्रसिंह धोनी : (119.33)
5) आमीर खान : (104.25)
6) अक्षयकुमार : (127.83)
7) विराट कोहली : (104.78)
8) सचिन तेंडुलकर : (40.00)
9) दीपिका पदुकोण : (59.00)
10) हृतिक रोशन : (74.50)
(* उत्पन्न कोटी रुपयांत)
याशिवाय ए. आर. रेहमान (14 वा क्रमांक), अजिंक्य रहाणे (25 वा क्रमांक), कपिल शर्मा (27 वा क्रमांक), साईना नेहवाल (39 वा क्रमांक), चेतन भगत (66 वा क्रमांक), रजनीकांत (69 वा क्रमांक), अजय-अतुल (82 वा क्रमांक) हे अन्य सेलिब्रेटीही या यादीत आहेत.

Next >>