Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

सर्वाधिक तंत्रज्ञान स्टार्टअप असलेला भारत तिसरा मोठा देश : गुगल

 google

देशात ४,१०० पेक्षा जास्त तंत्रज्ञान स्टार्टअप कंपन्या आहेत. ही जगभरातील तिस-या क्रमांकाची स्टार्टअप संख्या आहे. येत्या काही वर्षात ही संख्या अनेकपटींनी वाढेल, असा अंदाज जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन गुगलने लावला आहे. तसेच देशात सध्या ३० कोटी पेक्षा जास्त लोक इंटरनेटचा वापर करत आहेत. २०१७ पर्यंत यामध्ये आणखी २० कोटींची भर पडण्याची शक्यताही या कंपनीने व्यक्त केली आहे.

देशातील तंत्रज्ञान लाटेविषयी गुगल इंडियाचे हेड राजन आनंद म्हणाले, की वेबच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था आणखी सक्षम होण्यास मदत होणार आहे. यामुळे व्यवसायवृद्धी आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी विकासाच्या संधी निर्माण होतील. ४,१०० पेक्षा जास्त तंत्रज्ञान स्टार्टअप कंपन्या भारतात आहेत. येत्या २०२०पर्यंत ही संख्या हजारांच्या पटीत वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. २०१८पर्यंत ८० लाख भारतीय कंपन्या ऑनलाईन व्यवहार करतील.

कंपनीच्या उपक्रमाचा भाग म्हणून गुगलने https://digitalindia.withgoogle.com/intl/en-in ही वेबसाइट सुरू केली आहे. यामधून भारतात तंत्रज्ञान क्रांती कशी घडत आहे हे यावरून सांगण्यात येणार आहे. यावर उद्योजक आणि छोटय़ा-मध्यम व्यवसायांनी स्वप्न, ध्येय आणि ते गाठण्यासाठी दाखवलेली जबरदस्त इच्छाशक्ती याचा यशस्वी प्रवास उलगडून दाखवण्यात येणार आहे. यामध्ये गुगलने त्यांना कशाप्रकारे मदत केली हे दाखवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या भारत दौ-याच्या पार्श्वभूमीवर ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. जन्माने भारतीय असलेले पिचाई हे या वेळी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

Next >>