Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

ऐतिहासिक ‘क्लायमेट डील’ अखेर सादर 

 CLIMATE CHANGE

जागतिक हवामान बदलविषयक मैलाचा दगड ठरू शकणारा सर्व देशांच्या प्रतिनिधीने संमत केलेला मसूदा लॉरेंट फबुयस यांनी सादर केला. या मसुद्यामुळे अर्थव्यवस्थेमुळे जागतिक तापमानवाढीला तसेच हवामान बदलाला तोंड देणा-या जगाला सावरण्याचे पहिले पाऊल पडले आहे. पॅरिस येथे सुरु असलेल्या हवामान बदल संमेलनात जवळपास 2 आठवडय़ांच्या दीर्घ चर्चेनंतर पर्यावरण वाचविण्यासाठी अंतिम मसूदा जारी करण्यात आला. या मसुद्यात जगातील तापमानवाढीचा दर 2 डिग्री सेल्सियसपेक्षा खाली आणण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.

प्रस्तावित हवामान बदल न्यायोचित, ठोस आणि कायदेशीर रुपाने बंधनकारक आहे. फ्रान्सने सर्व देशांना हवामान बदलावर पहिला जागतिक करार करण्याचे आवाहन केल्याचे फ्रान्सचे विदेश मंत्री लोहोंग फबुयस यांनी सांगितले. फ्रान्स आणि संयुक्त राष्ट्र अधिकाऱयांनी पर्यावरण वाचविण्यासाठी हा अंतिम मसूदा दोन आठवडय़ांपर्यंत चाललेल्या चर्चेनंतर तयार केला. या मसुद्याला संयुक्त राष्ट्राच्या 6 अधिकृत भाषांमध्ये अनुवादानंतर सकाळी साडे अकरा वाजता (आंतरराष्ट्रीय वेळेनुसार साडे दहा वाजता) मंत्र्यांसमोर सादर करण्यात आले, ज्यांनी तो मंजूर केला आहे.

सर्वाधिक तापमान नोंद झालेल्या वर्षाच्या अखेरीस आणि चार वर्षांच्या संयुक्त राष्ट्रस्तरावरील चर्चेनंतर विकसित तसेच विकसनशील देशातील मतभेदामुळे ताटकळत असलेला हा विषय मार्गी लागला आहे. यासाठी जवळपास 200 देशांनी समर्थन दर्शविल्याचे फबुयस यांनी सांगितले.इतिहासाबाबत आमची जबाबदारी अफाट आहे, असे फबुयस यांनी सर्व देशांच्या प्रतिनिधींमसोर बोलताना सांगितले. या प्रतिनिधींमध्ये प्रेंच राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा होलांदे आणि अमेरिकेचे विदेशमंत्री जॉन केरी यांचा समावेश होता. महत्त्वांकाक्षी आणि समतोल राखलेला हा करार जगासाठी ऐतिहासिक टर्निंग पॉइंट ठरेल, असे त्यांनी यावेळी म्हटले.उपलब्ध माहितीनुसार तापमानवाढीचा दर 2 टक्क्यांपेक्षा कमी आणण्याचे  लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. तसेच 100 बिलियन डॉलर्सचा वार्षिक निधी 2020 सालाच्या पुढे विकसनशील देशांकरता उभारला जाण्याची यात तरतूद आहे. तसेच ग्रीनहाउस वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी राष्ट्रीय लक्ष्यांचा 5 वर्षीय चक्राचा आढावा घेतला जाईल असेही समजते.

Next >>