Whats new

दिलीपकुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान

 DILIP KUMAR

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘पद्यविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजनाथ सिंह यांनी दिलीपकुमार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा गौरव केला.

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे मुंबईच अध्यक्ष आशिष शेलार, दिलीपकुमार यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सायराबानू आणि त्यांचे निकटचे नातलग यावेळी उपस्थित होते.

बॉलीवूडमध्ये ‘टॅजिडी किंग’ या नावाने ओळखले जाणारे बुजुर्ग अभिनेते दिलीपकुमार यांनी आपल्या कारकिर्दीत अनके सूपरहिट चित्रपट दिले. चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र सरकारच्यावतीने त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कार जाहीर झाला होता. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रतींच्या हस्ते त्यांना पुरस्कारने गौरविण्यात येणार होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिलीपकुमार यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वतः दिलीपकुमार यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन त्यांना पद्यविभूषण पुरस्कार प्रदान केला.

Next >>