Whats new

सौदीमध्ये महापालिकेत प्रथमच महिलांची निवड

 SAUDI LADIES

महिलांना प्रथमच मतदानाचा हक्क देत सौदी अरेबियाने समानतेच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले असून, महापालिका निवडणूक चार महिलांनी विजय मिळविला आहे. सौदीत प्रथमच महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये महिलांनी मतदान करण्याची परवानगी मिळाली होती. या निवडणुकीत महिलांनाही उमेदवार म्हणून उभे राहण्यास प्रथमच परवानगी दिली होती. महिलांनी वाहन चालविण्यास बंदी आणि कायम बुरख्यात राहण्याची सक्ती असणारा हा देश त्यांना मतदानास बंदी करणारा शेवटचा देश होता. सौदीमध्ये फक्त महापालिकेसाठीच मतदान घेण्यात येते. उर्वरित ठिकाणी राजाने नियुक्त केलेले अधिकारी असतात. मक्का आणि तौबुक महापालिकांत प्रत्येकी एक व इहासा महापालिकेत दोन महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. महापालिकांसाठी 25 टक्के मतदान झाले होते.

Next >>