Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

सेवाक्षेत्रात एफडीआय २० टक्क्यांनी वाढला

 FDI

व्यापार सुलभता वाढविणे आणि गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतल्याने चालू वित्तीय वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सेवा क्षेत्रात एफडीआयचा प्रवाह २० टक्क्यांनी वाढून १.४६ अब्ज डॉलर (९,४०४ कोटी रुपये) झाला. औद्योगिक धोरण आणि संवर्धन विभागातर्फे (डीआयपीपी) ही माहिती देण्यात आली. बँकिंग, विमा, आऊटसोर्सिंग, संशोधन आणि विकास, कुरिअर आणि तंत्रज्ञान या सेवाक्षेत्रात एप्रिल-सप्टेंबर २०१४ या काळात १.२२ अब्ज डॉलरची ७,३६६ कोटी रुपये विदेशी गुंतवणूक (एफडीआय) झाली.

सरकारने विविध उपायांची घोषणा केल्याने या क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. कॉर्पोरेट कायदेविषयक सुविधा प्रदान करणारी कंपनी शार्दूल अमरचंद अँड मंगलदासच्या कर विभागाचे प्रमुख आणि एफडीआयतज्ज्ञ कृष्ण मल्होत्रा म्हणाले की, बँकिंग आणि विमा यासारख्या क्षेत्रात करण्यात आलेल्या नवीन सुधारणांनी या क्षेत्रातील एफडीआय वाढला आहे.सरकारने विमा क्षेत्रातील एफडीआयची मर्यादा वाढवून ४९ टक्के केली आहे. बँकिंग क्षेत्रातही सरकारने नियम शिथिल केले आहेत. स्थानिक खाजगी बँकांत पोर्टफोलियो गुंतवणूकदारांना ७४ टक्क्यांपर्यंत हिस्सेदारी खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. देशातील व्यवसाय सुलभता वाढावी यासाठी सरकारने मंजुरी देण्यासारख्या बाबींना कालमर्यादा निश्चित केली आहे. देशाच्या सकल घरेलू उत्पादनात सेवा क्षेत्राचा ६० टक्के वाटा आहे. या विभागातच मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूक होते.

Next >>