Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

भारताच्या अनिर्बन लाहिरीला ‘ऑर्डर ऑफ मेरिट’

 lahidi

प्रतिभाशाली गोल्फपटू अनिर्बन लाहिरी याने ‘आशियाई टू ’ चा ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा सर्वोच्च किताब पटकावला आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा गोल्फपटू ठरला. लाहिरीने यंदा १,१३९,०८४ डॉलर बक्षीस रकमेची कमाई केली.लाहिरीसाठी यंदाचा मोसम फलदायी ठरला. त्याने फेब्रुवारीत तीन आठवड्यांच्या आत मलेशियन ओपन आणि इंडियन ओपन या दोन स्पर्धा जिंकल्या. याशिवाय त्याने ‘पीजीए मेजर’ स्पर्धेत भारतीय गोल्फच्या इतिहासात संयुक्त पाचव्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी केली.

लाहिरी म्हणाला की, ‘मलेशिया आणि भारतातील यश माझ्यासाठी अविस्मरणीय ठरेल. त्यामुळेच मी ‘मास्टर्स’मध्ये प्रवेश करू शकलो. सेंट अँड्यूजवरील ‘ओपन’मध्ये मी प्रथमच खेळू शकलो. या कामगिरीमुळे आत्मविश्वास उंचावला. मला अनुभव मिळाला. सर्वोत्तम खेळाडूंचा आदर मी कमावू शकलो. हे सहज घडत नसते.’ लाहिरी ‘आशियाई गोल्फ टूर’वर २००८ पासून पूर्ण मोसम खेळत आहे. या ‘टूर’वर सातत्य राखल्यास यश येते. तुम्हाला ‘टॉप ३०’मध्ये प्रवेश मिळू शकतो, असेही त्याने नमूद केले. त्याने या ‘टूर’वर आतापर्यंत सात विजेतीपदे मिळविली आहेत.

लाहिरीची यशोमालिका-
· अनिर्बन लाहिरी जागतिक क्रमवारीत ४१वा
· दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट हेंडवर लाहिरीची निर्णायक आघाडी
· स्कॉटची बक्षीस रक्कम ४९१,६३१ डॉलर
· लाहिरीचा यंदाच्या मोसमात ‘टॉप फिफ्टी’मध्ये प्रवेश
· ‘पीजीए टूर’वरील ‘मेजर’ स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकांत स्थान
· प्रेसिडेंट्स करंडक स्पर्धेस प्रथमच पात्र
· अमेरिकेतील ‘पीजीए टूर’चे ‘टूर कार्ड’ संपादन
· भारताकडून यापूर्वी जीव मिल्खासिंग याला (२००६, ०८) दोन वेळा हा बहुमान
· ज्योती रंधावा (२००२) व अर्जुन एटवाल (२००३) यांच्याकडूनही हा पराक्रम
· लाहिरी २०१३ मध्ये ‘मेरिट लिस्ट’मध्ये तिसरा, तर २०१४ मध्ये दुसरा

Next >>