Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

‘गोदरेज’चे कमल नंदी यांना ‘मॅन ऑफ द अप्लायन्सेस’ पुरस्कार

 KAMAL-NANDI

‘द कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (सीइएएमए)च्या वतीने सर्वोच्च मानाचा पुरस्कार ‘गोदरेज अप्लायन्सेस’चे व्यवसाय प्रमुख व कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी यांना प्रदान करण्यात आला आहे. भारताच्या अप्लायन्सेस उद्योगात मोलाचे योगदान देणाऱया व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव जे. एस. दीपक यांच्या हस्ते नुकताच हा पुरस्कार देण्यात आला. गोदरेज कंपनीला अधिक व्हायब्रंट व ब्रँड बनविण्यासाठी नंदी यांचे मोठे योगदान आहे. बाजारपेठेबद्दलचे विस्तृत ज्ञान, औद्योगिक हेतू, कुशाग्रबुद्धी व योग्य धोरण या गुणांमुळेच नंदी आज या उंचीवर पोहोचले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गोदरेजच्या शिरवळ आणि मोहाली येथील उत्पादन युनिट्सना ‘प्लॅटिनम ग्रीन को सर्टिफिकेशन पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.

Next >>