Whats new

आठ सार्वजनिक बँकांना सरकार देणार पाच हजार कोटीची मदत

 Indian-Payment-Banks

2015-16 या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील आठ बँकांना पाच हजार कोटीची मदत देणार आहे. बँकांनी आपल्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करण्याच्या अटीवर सरकार ही आर्थिक मदत देणार आहे. विजया बँक, सिंडिकेट बँक, इंडियन बँक या त्या बँकांमधील प्रमुख बँका आहेत. सरकारी बँकांनी आपल्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा आणावी आणि चांगल्या प्रमाणात नफा कमावल्यानंतर ही मदत देणार येण्यात असल्याचे अर्थ मंत्रालयातील एका वरीष्ठ अधिका-याने सांगितले. या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने आपण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने आतापर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्या नऊ महिन्यामध्ये 8 बँकांनी केलेल्या कार्यक्षमतेनुसार ही पाच हजार कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

Next >>