Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

सनी लिऑन बनली ‘चेन्नई स्वॅगर्स’ संघाची मालकीण

 suny-leon

प्रसिद्ध पोर्नस्टार व बॉलीवूड अभिनेत्री सनी लिऑन हिने टिव्ही कलावतांचा सहभाग असलेला ‘चेन्नई स्वॅगर्स’ हा क्रिकेट संघ विकत घेतला आहे. एकता कपूरने सुरू केलेल्या बॉक्स क्रिकेट लीगचा दुसरा हंगाम लवकरच सुरू होणार असून, त्यात चेन्नई स्वॅगर्स हा संघही सहभागी होणार आहे. या संघात टिव्ही कलाकार ऋत्विक धजनानी, मौनी रॉय आणि संग्राम सिंग या कलाकारांचा सहभाग आहे.

आपल्या क्रिकेट प्रेमाविषयी बोलताना सनी म्हणाली, मला लहानपणापासून क्रिकेटची आवड आहे. माझ्या वडिलांनाही क्रिकेटचा खेळ फार आवडायचा. त्यांच्याकडूनच मला क्रिकेटविषयी बरीच माहिती मिळाली. आता क्रिकेट संघ विकत घेतल्याने मी खऱया अर्थाने क्रिकेटशी जोडली जाणार असल्याचे सनी लिऑनने म्हटले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आपल्याला खुप आवडतो, असेही ती यावेळी म्हणाली.

Next >>