Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

स्वच्छ भारतसाठी जागतिक बँकेकडून 1.5 अब्ज डॉलरचे कर्ज

world bank

जागतिक बँकेने स्वच्छ भारत अभियानासाठी 1.5 अब्ज डॉलरचे कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. देशातील ग्रामीण भागात येत्या 2019 पर्यंत सुधारित आरोग्यसुविधा देण्यासाठी तसेच उघड्यावर मलविसर्जन रोखण्याच्या हेतूने राबविण्यात आलेल्या अभियानाला मदत करण्यासाठी जागतिक बँकेने हे पाऊल उचलले आहे. जगात 2.4 अब्ज नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यापैकी 75 कोटी लोक हे भारतातील असून त्यातील 80 टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. तसेच भारतातील ग्रामीण भागात 50 कोटींपेक्षा जास्त लोक उघड्यावर मलविसर्जन करतात. त्यांना अकाली मृत्यू, विविध आजार, छळणूक, आर्थिक नुकसान सहन करावे लागते, असे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे.

भारतात होणाऱ्या प्रत्येक 10 मृत्यूंपैकी एक मृत्यू योग्य आरोग्य सुविधांच्या अभावामुळे होते. विशेषतः ग्रामीण भागातील कमी उत्पन्न असलेल्या घरांना आरोग्य सुविधांचा अभाव सर्वांत जास्त सहन करावा लागतो, असे जागतिक बँकेचे संचालक ऑनो रुल यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानाला मजबूत करत, त्याच्या अंमलबजावणीस मदत करण्याचे जागतिक बँकेने ठरवले आहे. याचा ग्रामीण भागातील गरिब व असुरक्षित लोकांना फायदा होईल व त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

Next >>