Whats new

भारताची चांद्रयान-२ मोहीम २०१७ मध्ये

 CHANDRAYAN-2

भारताचे दुसरे चांद्रयान २०१७ मध्ये चंद्रावर उतरेल तसेच २०१९ मध्ये ‘आदित्य एल १’ ही देशाची पहिली सौर मोहीम हाती घेतली जाईल, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत दिली. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल १ ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावरील कक्षेतून हा अभ्यास केला जाईल. ही मोहीम २०१९-२० दरम्यान हाती घेतली जाईल. या मोहिमेसाठी ३७८.५३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Next >>