Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

2006 नंतर पहिल्यांदाच US मध्ये व्याजदरात वाढ

 US Federal Reserve  BANK

अमेरिकेच्या मध्यवर्ती फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केली. दशकभरात पहिल्यांदाच फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. २००८ मध्ये अमेरिकेत आलेल्या महामंदीमधून अमेरिका सावरत असल्यामुळे फेडरल रिझर्व्हकडून हा निर्णय घेण्यात आला.

फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. आता व्याजदर ०.५० टक्के झाला आहे. अमेरिकेत यावर्षी रोजगार निर्मितीमध्ये झालेली चांगली वाढ लक्षात घेऊन, फेडरलच्या समितीने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. २००८ मध्ये अमेरिकेतील महामंदीमध्ये अनेक उद्योग बुडाले होते. त्यामुळे रोजगार निर्मितीमध्ये कमालीची घट झाली होती. फेडरल रिझर्व्हने त्यावेळी व्याजदर कमी केल्यानेजगातील अनेक देशांना दिलासा मिळाला होता. आता पुन्हा रोजगार निर्मितीचे चक्र सुरु होऊन, अमेरिकी अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयाचे जागतिक बाजारातही निश्चितच काही प्रमाणात पडसाद उमटतील.

फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करून अमेरिकेची अर्थव्यवस्था 2008 च्या आर्थिक मंदीतून पहिल्यांदा बाहेर पडल्याचे संकेत दिले आहेत. भविष्यातही अर्थव्यवस्थेत तेजी दिसेल, अशी आशाही फेडरल रिझर्व्हने व्यक्त केली आहे. नवा दर 0.25 ते 0.50% असा झाला आहे. आधी 0 ते 0.25% असा दर होता.

भारतावर असा होईल परिणाम-
1. बाजार कोसळण्याची शक्यता
- फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्वहेस्टर्स बाजारातून पैसा काढून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- नोव्हेंबरमध्ये बाजारातून14,212 कोटी रुपये काढून घेतले होते.
- डिसेंबरमधील ट्रेडिंग सेशन व 2016 च्या सुरुवातीला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्वहेस्टर्स विक्री करू शकतात.

2. डॉलरची मागणी वाढणार
- डॉलरच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता
- रुपयाला व्हॅल्युएशन घसरणार. आयातीवरील खर्चात वाढ होणार

3. महागाई वाढेल
- आयातीवरील खर्च महागाणार
- नोव्हेंबरमध्ये महागाईचा दर 5.41 टक्के होता.
- महागाईचा दर 6 टक्क्यांपेक्षा वर गेल्यास आरबीआय व्याजदर कमी करण्यालचा निर्णयात बदल करून शकते.

Next >>