Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

जगातील सर्वात उंच रेल्वे पूल- भारतीय रेल्वे चिनाब नदीवर

  bridge

भारतीय रेल्वे चिनाब नदीवर 359 मीटर ऊंचीचा पूल तयार करत आहे. हा पूल आयफेल टॉवरपेक्षाही 35 मीटर अधिक उंच असणार आहे. रेल्वेने ही माहिती दिली आहे. रेल्वेने पूलचे डिझाइनही जारी केले आहे. रेल्च्या मते हा पूल एवढा मजबूत असेल की, रिश्टर स्केलवर 8 तीव्रतेचा भूकंप आला तरी या पुलाला काहीही नुकसान होणार नाही. 1315 मीटर लांबीच्या या पुलाचे काम सुरू आहे. चिनाब नदीवर बक्कल आणि कोरीदरम्यान हा पूल तयार केला जात आहे. 2016 मध्ये हा पूल तयार होणार आहे. विशेष म्हणजे याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ठरणार आहे.

25 हजार टन स्टीलपासून तयार होतोय पूल. हा पूल आर्क आकारात तयार करण्यात येत आहे. त्याचे मुख्य दोन केबल्स क्रेनच्या मदतीने नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर जोडले जाईल. पूलमध्ये एकूण 17 स्टील पिलर लावण्यात येत आहेत. त्यात सर्वात लांब खांबाची उंची 133 मीटर असेल. ब्रिज तयार करण्यासाठी 25 हजार टन स्टीलचा वापर करण्यात येत आहे. याठिकाणी अनेक अवजड साहित्य हेलिकॉप्टरच्या मदतीने पोहोचवण्यात येत आहे. कोकण रेल्वे कॉरपोरेशन हा प्रोजेक्ट सांभाळत आहे. या पुलाचे काम 2002 मध्ये सुरू करण्यात आले होते. पण वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे 2008 मध्ये याचे काम थांबवण्यात आले होते. एका अंदाजानुसार या पुलावरून प्रवास करणाऱ्यांना ताशी 250 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा सामना करावा लागेल. त्यामुळे हा पूल तयार करण्यात अनेक अडचणी येत आहेत.

Next >>